नवी मुंबई : भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. ठाणे सत्र न्यायालायनं गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. लैंगिक शोषण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दीपा चौहान नावाच्या महिलेनं गणेश नाईकांविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान यांनी आरोप करताना म्हटलं की, नाईक यांच्यासोबत असलेल्या संबंधातून मला मुल झालं. त्यानंतर त्यांनी माझ्यावर अनेकवेळा जबरदस्ती केली. गणेश नाईक यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. जो कोर्टाने फेटाळून लावला आहे.
'गेल्या 27 वर्षापासून मी गणेश नाईक यांच्या सोबत संबंधात होते. ते नुसते आश्वासन द्यायचे. मुलगा 5 वर्षाचा झाल्यानंतर मी वडील म्हणून त्याला नाव देईन. परंतू त्यांनी तसं केलं नाही. गणेश नाईक यांनी आर्थिक मदत दिली नाही.' असा आरोप ही त्यांनी केला आहे.
दुसरीकडे दीपा चौहान (Deepa Chauhan) या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.