close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर गर्डर टाकण्यासाठी आज 'मेगा ब्लॉक'

एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर आज लष्कराकडून गर्डर टाकण्याचं काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी मध्य-पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येतोय. 

Updated: Jan 27, 2018, 09:44 AM IST
एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर गर्डर टाकण्यासाठी आज 'मेगा ब्लॉक'

मुंबई : एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर आज लष्कराकडून गर्डर टाकण्याचं काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी मध्य-पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येतोय. 

पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकात नव्याने उभारण्यात येणाऱ्या पादचारी पूलाचं काम भारतीय लष्करामार्फत करण्यात येतंय. 

या पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येतोय. 

रात्री दीड ते रविवारी पहाटे साडे चारपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्लॉक दरम्यान उपनगरीय रेल्वे मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्यात.