कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी संजय लीला भंसाळी यांच्या ऐतिहासिक चित्रपट 'पद्मावती'वरून सुरू असलेल्या वादावर टीका केली आहे.
त्या म्हणाल्या, ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याला हळूहळू संपण्यासाठी हा 'दुदैवी' आणि सुनियोजित प्रयत्न आहे. ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून आपला संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या पद्मावती वाद केवळ दुर्दैवी नाही तर आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला संपवण्यासाठी एका राजकीय पक्षाची जाणून बुजून तयार केलेले कारस्थान आहे.
आम्ही या आणीबाणीची निंदा करतो, चित्रपट उद्योगातील सर्वांनी एकत्र येऊन एका स्वरात विरोध करायला हवा.
भंसाळी यांच्यावर राजपूत राणी पद्मावती यांच्या इतिहासाशी छेडछाड करण्याचा आरोप आहे. दरम्यान, त्यांनी याचा दरवेळी इन्कार केला आहे. हा चित्रपट एक डिसेंबर रोजी रिलीज होणार होता. सध्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपट निर्मात्यांना केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्डाने हिरवा कंदील अद्याप दाखवला नाही. बोर्डाने सांगितले की निर्मात्यांनी दिलेले निवेदन अपूर्ण आहे.
दुसरीकडे उच्च न्यायालयाने चित्रपटातील काही आक्षेपार्ह दृश्य काढण्यासाठी करण्यात आलेली याचिका रद्दबादल ठरवली आहे. मुख्य न्यायाधिश दीपक मिश्रा, न्या. ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या त्रिसदस्यी खंडपीठाला सूचित करण्यात आले की आतापर्यंत सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटा सेन्सॉर सर्टिफिकेट दिलेले नाही. यावर खंडपीठाने सांगितले की ' या याचिकेत हस्तक्षेप करणे म्हणजे पहिल्यापासूनच मत बनविणे होईल, त्यामुळे असे करण्याच्या बाजूने आम्ही नाही.
ही याचिका अधिवक्ता मनोहरलाल शर्मा यांनी दाखल केली होती. त्यांनी आरोप केला की, आतापर्यंत सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिले नाही. त्यापूर्वीच या चित्रपटाचे गाणे विविध माध्यमातून दाखविले जात आहे. शर्मा यांनी राणी पद्मावती यांच्या चरित्र हनन करणारे सर्व दृश्य चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी काढून टाकावे अशी विनंतर केली होती.