मुंबई : आज गव्हाणगावात एच पी सी एल च्या प्लांटमधून मोठ्या प्रमाणात catalist पावडर ची गळती झाली. त्यामुळे पूर्ण गावात विषारी पावडर पसरली आणि सर्व नागरिक खुप भयभीत झाले. गावात दत्त जयंती निमित्त असलेल्या भंडाऱ्या दरम्यान ही पावडर भाविकांच्या जेवणात गेली आणि सर्व भाविक भयभीत झाले.
या पावडरमुळे आपल्या शरीरास कोणता धोका निर्माण होईल अशी भीती नागरिकांच्या मनामध्ये आहे. आरसीएफ पोलीस ठाणे यांनी गावात येऊन या प्रकणाची चौकशी केली. त्याच प्रमाणे मुंबई फायर ब्रिगेड आणि मुंबई महानगर पालिका यांचे अधिकारी यांनी ही गावास भेट देऊन चौकशी केली.
पण एच पी सी एलचे कोणतेही अधिकारी साधी भेट देण्यास किंवा चौकशी करण्यास आले नाहीत. त्यामुळे सर्व नागरिक एच पी सी एल वर संतप्त झाले आहेत. जर या पावडरमुळे कोणास काही नुकसान झाले तर त्याला एच पी सी एल पुर्ण जबाबदार असेल, असे देखील सांगण्यात आले आहे.
जर या पावडर मुळे कोणास काही नुकसान झाले तर त्याला एच पी सि एल पुर्ण जबाबदार असेल.अशी भूमिका नागरिकांची आहे.तर या बाबत एचपीसीएल च्या अधिकाऱ्यांनी ही पावडर विषारी नसल्याचे आणि तसे काही झाल्यास दोषीवर कठोर कारवाई करणार असल्याचे आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब घावटे म्हणाले आहेत.
दरम्यान या घटनेवरुन माहुल प्रकल्पग्रस्तांनाही आक्रमक पवित्रा घेतला आहे.
"या अशा घटना घडण्याची ही काही पहिली वेळ नाही. या घटनांचा रहिवाशांना त्रास होऊ नये म्हणून औद्यगिक आणि रहिवाशी क्षेत्रात आवश्यक अंतर असायला हवं. तसेच या घटनेतून पुन्हा एकदा प्रदूषणाचा मुद्दा समोर आला आहे. यामुळे आमचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं" - रेखा गाडगे, माहुल प्रकल्पग्रस्त समिती.
माहूलमधील प्रदूषण कमी झाल्याचं एमपीसीबीने म्हंटलं होतं. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा त्यांचा खोटेपणा उघड झाला आहे. आम्हाला वेळीच सुरक्षित ठिकाणी घरं द्यावी : गजानन तांदळे
नेमका मुद्दा काय?
मुंबईत अनेक विकासकामं होतं असतात. अशाच विकासकामांमुळे तेथील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी पर्यायी घरं दिली जातात.काही वर्षांपूर्वी तानसा जलवाहिनी शेजारी राहणाऱ्यांचे स्थलांतर हे माहुल म्हाडा वसाहतीत करण्यात आले होते. मात्र हे ठिकाण राहण्यास योग्य नाही. त्यामुळे आम्हाला योग्य आणि सुरक्षित ठिकाणी कायमस्वरुपी हक्काचं घर द्यावं, या मागणीसाठी माहुल प्रकल्पग्रस्त 3 वर्षांपेक्षा अधिक काळ लढा देत आहेत