अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला

मुंबईवर पावसाचे ढग अजूनही कायम आहेत. त्यामुळं पुढच्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्य़ांनी नागरिकांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं आहे.

Updated: Aug 29, 2017, 11:21 PM IST
अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला title=

मुंबई : मुंबईवर पावसाचे ढग अजूनही कायम आहेत. त्यामुळं पुढच्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्य़ांनी नागरिकांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं आहे.

अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तसंच अत्यावश्यवक सेवा आणि त्यासंबंधीत सरकारी कर्मचारी कामावर असतील अशी माहिती त्यांनी दिली आहे. तर उद्या अशीच परिस्थिती राहिल्यास मुंबईतल्या सरकारी कर्मचा-यांना सुट्टी घेण्याची मुभा देण्यात आली आहे. मुख्य सचिवांच्या कार्यालयानं यासंदर्भात पत्रक जारी केलं आहे.