दिलीप वळसे पाटील कोरोना बाधित

 दिलीप वळसे पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह

Updated: Oct 29, 2020, 03:23 PM IST
दिलीप वळसे पाटील कोरोना बाधित

मुंबई : कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलाय.  आज सकाळी ते मंत्रालयात होते. नुकतेच दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते शेती इस्त्रालयची या सुधीर भोंगळे यांच्या शेतीविषयक पुस्तकाचे प्रकाशनही झाले होते. 

मंत्रिमंडळ बैठक सुरू होण्यापूर्वी कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वळसे पाटील घरी निघून गेले. वळसे पाटील यांना लक्षण नसल्याचे निकटवर्तीयनी सांगितले. त्यांना थोड्या वेळात रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

राज्यात काल कोरोनाचे ६,७३८ नवे रुग्ण आढळले आहे. तर८,४३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात कालपर्यंत एकूण १४॰८६,९२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे ८९.५३% एवढे झाले आहे. 

राज्यात कालपर्यंत ९१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर २.६२% एवढा आहे. कालपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७,६८,८७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,६०,७६६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,२८,५४४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,९८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

 देशभरात coronvirus कोरोना रुग्णांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणांच्या पुढं तरीही किमान काही अंशी कोरोनाचा प्रभाव काही भागांमध्ये कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा वेग हा शंभर दिवसांच्याही पलीकडे गेलेला असतानाच इथं महाराष्ट्रातही रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय सोअनेक आव्हानं उभी करत असतानाच काहीसा दिलासाही मिळू लागला आहे. पूर्णणे नसला मवारी मागील तीन महिन्यातील सर्वात कमी नवीन रुग्ण आढळून आल्याची नोंदही करण्यात आली आहे.