यंदाच्या दिवाळीत फटाक्यांचा 'फराळ '

बच्चेकंपनींसाठी खास दिवाळी 

Updated: Oct 26, 2019, 11:49 AM IST
यंदाच्या दिवाळीत फटाक्यांचा 'फराळ ' title=

मुंबई : दिवाळी म्हणजे लहान मुलांसाठी फटाके फोडण्याचा सण...पण फटाके न देता फटक्यांसारखाच दिसणारा इको फ्रेंडली असा हटके पर्याय आता बाजारात आला आहे. हा फराळ आहे सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब, रॉकेट,  फुलबाजी, पाऊस आणि चक्री सुद्धा आहे. फराळ आणि फटाक्यांची नावं. गोंधळलात ना? पण हा हटकेच फराळ आहे. कारण हा फटाक्यांचा नावाचा फराळ तुम्हाला खाता येणार आहे. 

हो तुम्ही हे फटाके चक्क खाऊ शकणार आहात. कारण हुबेहुब फटाक्यांसारखी दिसणारी हे आहेत चॉकलेट्स... दिवाळी निमित्त बाजारात असे चॉकलेट्सचे फटाके उपलब्ध आहेत. पर्यावरणात फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी आणि सोबतच लहान मुलांन  याबाबत जागरुक करण्यासाठी कांदिवलीच्या दोन बहिणींनी हा हटके पर्याय समोर आणला आहे. गुंजन आचार्य आणि एकता आचार्य या तरुणींनी चॉकलेट्सचे हे फटाके तयार केले आहेत.

200 रुपयांपासून ते 1 हजार रुपयांपर्यंत हा फॅन्सी पर्याय बाजारात उपलब्ध आहे. चॉकलेट्स आणि त्याचं फटाक्यांसारखं क्रिएटीव्ह पॅकेजींग असल्याने अगदी कॉर्पोरेट ऑफिसेस ते सामान्य ग्राहकांपर्यंत सगळ्यांचाच त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. फटाके खरेदी करुन प्रदुषणाला आमंञण देण्यापेक्षा लहान मुलांचं समाधान होईल असा 'इको फ्रेंडली' फटाक्यांचा पर्याय ट्राय करायला काय हरकत आहे.