एनकाउंटर स्पेशालिस्ट दया नायक करोना पोझिटीव्ही

सध्या होम कॉरेंटाइन होण्याचा सल्ला देण्यात आला 

Updated: Sep 21, 2020, 07:41 PM IST
 एनकाउंटर स्पेशालिस्ट दया नायक करोना पोझिटीव्ही

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. भारतसह संपूर्ण जगभरात कोरोना व्हायर या महामारीचा कहर वाढत चालला आहे. जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा हा ३ कोटींवर गेला आहे. यासोबतच ३१,२३९,५८८ लोकं कोरोनामुक्त झाले आहेत.  भारतात दररोज ९० हजारहून अधिक लोकोंना कोरोनाची लागण होत आहे. अशातच आता एनकाउंटर स्पेशालिस्ट दया नायक करोना पोझिटीव्ही आले आहेत. 

दया नायक सध्या एटीएसमध्ये नियुक्त आहेत. दया नायक एटीएसच्या जुहू युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमक्या आल्या होत्या. या बड्या नेत्यांना धमकी आल्याने त्याचा तपास एटीएसकडून दया नायक  करत होते.

या तपासासाठी त्यांना मुंबई बाहेर आणि राज्याच्या बाहेरही जावं लागलं होतं.  ते सतत आरोपीच्या शोधात आणि आरोपींच्या संपर्कात होते.याच काळात त्यांना कोरोनाची लागण झाल्याची श्यक्यता व्यक्त केली जात आहे. दया नायक यांना सध्या होम कॉरेंटाइन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.