वरळी येथील ससमिरा कॉलेजमध्ये स्फोट; चार विद्यार्थी गंभीर जखमी

वरळी येथील ससमिरा इस्टिट्यूट ऑफ डिजाईन या कॉलेजमध्ये बुधवारी  संध्याकाळी 5.00 च्या सुमारासही दुर्घटना घडली. 

Updated: Nov 16, 2022, 11:08 PM IST
वरळी येथील ससमिरा कॉलेजमध्ये स्फोट; चार विद्यार्थी गंभीर जखमी title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : वरळी(Worli ) येथील ससमिरा इस्टिट्यूट ऑफ डिजाईन( Sasmira Institute of Design) या नामांकित कॉलेजमध्ये स्फोट झाला आहे. यात चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वरळी पोलिस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

वरळी येथील ससमिरा इस्टिट्यूट ऑफ डिजाईन या कॉलेजमध्ये बुधवारी  संध्याकाळी 5.00 च्या सुमारासही दुर्घटना घडली.  रसायन गळतीमुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कॉलेजमधील एका प्रशिक्षण वर्गा जवळ असलेली ग्लिसरीनच्या टाकीतून रसायन गळती होऊन हा स्फोट झाल्याचे समजते.

जखमींना नवी मुंबईतील ऐरोली येथील बर्न रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका विद्यार्थिनी गंभीर भाजली आहेत. श्रद्धा शिंदे (27 वर्षे), प्रतीक्षा घुमे (20 वर्षे),  राजीव कुलकर्णी , प्रज्योत वदे अशी जखमींची नावे आहेत .
वरळी पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद झाली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. ही दुर्घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली यामागचे नेमके कारण तपासानंतर समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.