close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गोपाळकाला सुट्टीबाबतचा शाळा, महाविद्यालयातील संभ्रम दूर

गोपाळकाला सुट्टीबाबतचा शाळा, महाविद्यालयातील संभ्रम दूर करण्यात आला 

Updated: Aug 23, 2019, 08:47 PM IST
गोपाळकाला सुट्टीबाबतचा शाळा, महाविद्यालयातील संभ्रम दूर

मुंबई : गोपाळकाला सुट्टीबाबतचा शाळा, महाविद्यालयातील संभ्रम दूर करण्यात आला आहे. उद्याच्या सुट्टीबद्दल आज संध्याकाळ पर्यंत शाळा महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना नोटीस न मिळाल्याने ते द्वीधा मनस्थितीत होते. पण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उद्याची सुट्टी जाहीर न झाल्याने शिक्षण विभागाकडून सुट्टी असल्याचे स्पष्ट, शाळा,महाविद्यालयांमध्ये संभ्रम दूर झाला. शिक्षण विभागाकडून पञ काढून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे शहरामध्ये दहीहंडी उत्सवाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात असते. या सर्वात विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे शहरामध्ये सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे पत्रक शिक्षण विभागाकडून काढण्यात आले. 

उद्या शनिवारी शासकीय कामकाज नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही सुट्टी जाहीर केलेली दिसत नाही. तरी शिक्षण विभागातर्फे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करत आहोत असे ट्वीट शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केले आहे.