मुंबई : महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेला हादरवून टाकणारी ही बातमी आहे, रिलायन्स उद्योग समूहाचे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्याघरासमोर स्फोटकांनी भरलेली जी गाडी सापडली होती, त्या गाडीच्या मालकाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कारण, त्या स्कॉर्पिओ (Scorpio owner) गाडीचे मालक हिरेन मनसुख (Hiren Mansukh) हे कालपासून बेपत्ता होते, त्याचा मृतदेह आज मुंब्रा (Mumbra) रेतीबंदर खाडीत मिळाला आहे, हिरेन त्यांच्या कुटुंबियांनी आज दुपारी नौपाडा पोलीस ठाण्यात ते बेपत्ता (Hiren mansukh missing) असल्याची तक्रार दाखल केली होती. पण त्यांचा आज मृतदेह सापडल्याने मोठा खळबळ उडाली आहे.
रिलायन्स उद्योग समूहाचे मालक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ (Antelia) स्कार्पिओ गाडीत स्फोटकं सापडली होती, यानंतर याविषयी या गाडी मालकाने आपली गाडी खराब झाल्याने आपण ती रस्त्यात सोडून ओलाने कामासाठी पुढे निघून गेलो होतो, असं मीडियासमोर येऊन सांगितलं होतं, कालपर्यंत ज्या व्यक्तीने मीडियासमोर येऊन आपली प्रतिक्रिया दिली, त्या व्यक्तीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे मुकेश अंबानी यांच्याघरासमोर जी स्फोटकं सापडली, हे प्रकरण आणखीन गंभीर असल्याचं दिसून येत आहे.
हिरेन मनसुख यांचं ठाण्यात ऑटो पार्टसचं दुकान आहे, ते कामानिमित्त मुंबईला जात असताना, त्यांच्या गाडीचं स्टेअरिंग जॅम झालं होतं, म्हणून ते गाडी तेथेच सोडून ओलाने निघून गेले होते, तीच गाडी पुन्हा मुकेश अंबानी यांच्याघरासमोर स्फोटकं ठेवण्यासाठी वापरण्यात आली, पण आज त्या गाडी मालकाची हत्या झाल्याचं समोर आलं आहे, यामुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का देणारी बातमी असल्याचं सांगण्यात येत आहे.
(Hiren Mansukh owner of scorpio with explosives found near Ambanis house found dead)