महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालाची तारीख जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख अखेर जाहीर.

Updated: May 29, 2018, 10:56 PM IST

पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल ३० मे रोजी जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल ३० मे दुपारी १ पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. बारावीचा निकाल कधी लागणार याविषयी विद्यार्थ्यांची दिवसेंदिवस उत्कंठा वाढत चालली होती, अखेर बोर्डाने बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बारावीचा निकाल http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर पाहता येणार आहे. यंदा १४ लाखांवर विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. यंदा देखील बारावीच्या परीक्षेत मुली बाजी मारतील असं म्हटलं जात आहे.

वेळेवर निकाल लावण्यास प्राधान्य

राज्याच्या बोर्डाच्या अध्यक्षा शकुतला काळे यांनी यंदा बारावी आणि दहावीचा निकाल वेळेवर लागणार असल्याचं म्हटलं होतं, त्याप्रमाणे बारावीचा निकाल उद्या ३० मे रोजी जाहीर होणार आहे, तर दहावीचा निकाल देखील १० जूनच्या आत लावण्याचा बोर्डाचा प्रयत्न आहे.

१४ लाखांवर परीक्षार्थींचा निकाल

बारावी परीक्षेला राज्याच्या ९ विभागांमधून १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी बसले होती. राज्यभरातील २ हजार ८२२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती.