close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राजीव गांधींविषयी मला आदरच- नवाजुद्दीन सिद्दीकी

प्रत्येक गोष्टीत कलाकारांनी हस्तक्षेप करणे हे चुकीचे ठरेल.

Updated: Aug 26, 2018, 06:39 PM IST
राजीव गांधींविषयी मला आदरच- नवाजुद्दीन सिद्दीकी

मुंबई: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी 'सेक्रेड गेम्स'मध्ये आक्षेपार्ह विधान केल्यावरुन अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी टीकेचे लक्ष्य झाला आहे. याबाबत नवाजने आपली बाजू स्पष्ट केलीये. 

मी साकारलेली भूमिका ही एक प्रकारचे काल्पनिक पात्र होते. मी फक्त त्यासाठी अभिनय केला होता. प्रत्येक गोष्टीत कलाकारांनी हस्तक्षेप करणे हे चुकीचे ठरेल. किंबहुना ती माझी जबाबदारीच नाही. निर्माता- दिग्दर्शकांच्या विरोधात मी जाऊ शकत नाही.

मी फक्त एक भूमिकाच साकारत होतो, असे सांगत राजीव गांधी यांच्याविषयीच्या वादाबाबत भूमिका मांडली. व्यक्तीगतपणे आपण राजीव गांधींचा आदरच करत असल्याचे नवाजने सांगितले.