विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ; अकरावी सीईटी प्रक्रिया पुन्हा सुरू

कॉलेजमध्ये प्रेवेश घेण्यापुर्वी विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा द्यावी लागणार आहे.

Updated: Jul 26, 2021, 09:19 AM IST
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ; अकरावी सीईटी प्रक्रिया पुन्हा सुरू

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता दहावी बोर्डाच्या  परीक्षा रद्द करत सरकारने अंतर्गत मुल्यमानाच्या आधारावर विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला. पण कॉलेजमध्ये प्रेवेश घेण्यापुर्वी विद्यार्थ्यांना  सीईटीची परीक्षा द्यावी लागणार आहे. अकरावी सीईटी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. दुपारी तीन पासून वेबसाईटवर अर्ज भरता येणार. 2 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. यापुर्वी तांत्रिक कारणामुळे अर्ज प्रक्रियेत अडथळा आला होता.

CET  म्हणजेच अकरावीची प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जुनिअर कॉलेजमध्ये (Junior College) प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासठी ही परीक्षा असणार आहे. एकूण 100 मार्कांची ही परीक्षा असणार आहे. यात  इंग्रजी , गणित , विज्ञान आणि  सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी 25 मार्कांचे प्रश्न असणार आहेत.

CET परीक्षा इच्छुक असणारे विद्यार्थी  cet.mh-ssc.ac.in आणि  mahahsscboard.in वर लॉगइन करून अर्ज भरू शकतात. सरकारच्या अधिसूचनेनुसार, ज्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेश हवा आहे तेच ही परीक्षा देऊ शकतील.