बॉलीवूडच्या बेबोकडून डिलिव्हरीनंतरचा पहिला फोटो शेअर

सोशल मीडियावर फोटो इतका वायरल झाला, जणू काही तिचे फॅन्स तिच्या पोस्टचीचं वाट पाहत होते

Updated: Mar 1, 2021, 09:39 PM IST
बॉलीवूडच्या बेबोकडून डिलिव्हरीनंतरचा पहिला फोटो शेअर

मुंबई : सोशल मीडियावरती नेहमीचं Active असलेली बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या दुसर्‍या डिलिव्हरीनंतर बर्‍याच काळ सोशल मीडियापासून लांब होती. पण सोमवारी तिने सोशल मीडियावर पदार्पण केलं. तिने चाहत्यांसाठी तिच्या डिलिव्हरीनंतरचा पहिला फोटो शेअर केला आहे.

हा फोटो एक सेल्फी आहे. यामध्ये तिने काळ्या रंगाचा चष्मा लावला आहे आणि डोक्यावर हॅट घातली आहे. यामध्ये करीनाने हलक्या निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. सरळ कॅमेऱ्याकडे बघत तिने हा फोटो काढला आहे.

करीनाने हा फोटो शेअर करत त्यावर Caption टाकले -  HELLO  Everyone ... तुम्हाला खूप Miss केलं..

तिने हा फोटो शेअर करताचं तो सोशल मीडियावर इतका वायरल झाला, जणू काही तिचे फॅन्स तिच्या पोस्टचीचं वाट पाहत होते. 2 तासात हा फोटो इतका व्हायरल झाला की, जवळ जवळ 4 लाख 50 हजारपेक्षा अधिक लोकांनी त्याला लाईक आणि शेअर केले. काहींनी तर हर्ट आणि फायर इमोजीचा वर्षाव केला, तर काही लोकांनी तिला Miss you too असे उत्तर ही दिले. 

करीनाने लग्नानंतर 4 वर्षांने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला ज्याचं नाव त्यांनी तैमूर अली खान असे ठेवले होते. या नावावरुन सुरवातीला खूप वाद झाले, पण नंतर सर्वांनी त्याला स्वीकारले, सोशल मीडियावरही तो खूप चर्चेत असतो. आता दुसर्‍या मुलाच्या जन्मानंतर त्याचं नाव काय ठेवलं जाणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.