मुंबईत तयार होणार तिसरा सी-लिंक; प्रवाशांचा तासाभराचा वेळ वाचणार, असा असेल मार्ग?

Nariman Point to Colaba Sea Way: कुलाब्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मदत होणार आहे. नरीमन पॉइंट ते कुलाबा पाच मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 27, 2024, 03:33 PM IST
मुंबईत तयार होणार तिसरा सी-लिंक; प्रवाशांचा तासाभराचा वेळ वाचणार, असा असेल मार्ग? title=
maharashtra government approve bridge in the sea between colaba and naiman point

Nariman Point to Colaba Sea Way: मुंबईकरांना आता लवकरच आणखी एक सागरी सेतू मिळणार आहे. कुलाबा ते नरीमन पॉइंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच, सी लिंकमुळं कुलाब्यातील वाहतूक कोंडी फोडण्यास मदत होणार आहे

दक्षिणेकडे जाण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे. तसंच, कोळी बांधवांना त्रास होऊ नये यासाठी नवीन मार्ग तयार करण्यात येणार आहे. यापूर्वी नरीमन पॉइंट ते कफ परेडपर्यंत असा पुलाचा मार्ग होता. मात्र या पुलाचा मार्ग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं समुद्राच्या मधून जाणारा पूल आता किनाऱ्यावरुन जाणार आहे. या सागरी सेतुमुळं कुलाबा भागातील वाहतूक कोंडी फुटणार आहे. 

नरीमन पॉईंट येथील एनसीपीए किनाऱ्याला लागून बधवार पार्क मार्गे जाणारा रस्ता तयार केला जाणार आहे. या रस्त्याला लागून मस्तालय विकसित केले जाईल. तसंच, यामुळं पर्यटनासाठी चालना मिळावी व मुंबईकरांसाठी मनोरंजनाची नवी संधी उपलब्ध होणार

4 लेनचा पूल होणार 

नरीमन पॉईंटच्या एनसीपीएपासून सुरू होणार पूल कुलाबा फायर स्टेशनपर्यंत असणार आहे. पुलाला 4 लेन असणार आहेत. 2 लेन नरीमन पॉइंट आणि 2 लेन कुलाबाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी आहेत. मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा पुल महत्त्वाचा आहे. त्यामुळंच सरकार आता तिसरा सी-लिंक उभारण्याच्या प्रकल्पावर काम करत होते. मुंबईत वांद्रे ती वरळीपर्यंत 5.6 किमी लांबीचा सी लिंक 2010मध्ये सुरू झाला होती. त्यानंतर वांद्रे ते वर्सोवादरम्यान 17.7 किमी लाबींचा सी लिंक आकारास येत आहे. 2019 मध्ये या पुलाचे काम सुरू झाले होते.