मुंबई: Wine Sale : तुम्ही किराणा दुकानात जात असाल तर ही तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आहे. कारण दुकानात वाईनच्या बाटल्या दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको. सरकार दैनंदिन गरजेची दुकाने, डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि बेकरींमधून वाईनच्या बाटल्यांच्या विक्रीला परवानगी देणारी अधिसूचना जारी करू शकते. त्यामुळे लवकरच दुकानात वाईन मिळू शकते.
दरम्यान, सरकारने 10 रुपये प्रति लीटर अबकारी कर जाहीर केल्याने वाईन आणखी महाग होणार आहे. महाराष्ट्र सरकारने मंगळवारी नाममात्र अबकारी कर म्हणून वाईनवर (सर्व प्रकारचे वाइन) प्रति लिटर 10 रुपयांची वाढ जाहीर केली. दैनंदिन गरजांची दुकाने, डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि बेकरींमधून वाईनच्या बाटल्यांच्या विक्रीला परवानगी देणारी अधिसूचना जारी करू शकते. याचे मुख्य कारण असे आहे की बहुतेक वाइनमध्ये इतर मद्यांच्या तुलनेत अल्कोहोलचे प्रमाण खूपच कमी असते.
तसेच, मोठ्या संख्येने रेस्टॉरंट आणि बेकरी स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी वाइन वापरतात. 2000 पासून, द्राक्ष शेतकरी बाजार आणि देशांतर्गत वाइन निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वाइनवर कोणताही कर नाही, तर त्यापूर्वी कर खूपच कमी होता. नवीन कर लागू केल्याने राज्याला केवळ 5 कोटी रुपयांचा महसूल मिळणार असला तरी, उत्पादन शुल्क प्रशासनाला बाजारात विकल्या जाणार्या वाईनच्या बाटल्यांवर लक्ष ठेवण्यास मदत होईल, असे मुख्य उत्पादन शुल्क सचिव वल्सा नायर सिंह यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात सध्या 70 लाख लिटरची प्रतिवर्षी होणारी विक्री 1 कोटी लिटरपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, बारला सीलबंद वाइनच्या बाटल्या विकण्याची परवानगी दिली जाईल आणि वाइन बारसाठी, दोन बारमधील किमान 200 मीटर अंतराचा नियम आता लागू होणार नाही, असे सांगितले जात आहे. प्रस्तावित धोरणानुसार बीअरच्या धर्तीवर बार्स उत्पादकांना किंवा कॅनमध्ये वाइन देऊ शकतात.
दुकानात वाईन विक्री करण्याबाबतचे नवीन धोरण काही दिवसात जाहीर केले जाऊ शकते. राज्य उत्पादन शुल्कने अलीकडेच व्हिस्कीसारख्या आयात केलेल्या मद्यावरील शुल्क पूर्वीच्या 300 टक्क्यांवरून 150 टक्के कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.