वरळीची बीडीडी चाळ आणि मनोहर पर्रिकर यांचं विशेष नातं

मनोहर पर्रिकर यांचं बीडीडी चाळीशी असलेलं विशेष नातं

Updated: Mar 18, 2019, 04:51 PM IST
वरळीची बीडीडी चाळ आणि मनोहर पर्रिकर यांचं विशेष नातं

मुंबई : बीडीडी चाळ आणि मनोहर पर्रिकर यांचंही विशेष नातं होतं. वरळीच्या बीडीडी चाळ क्रमांक २१ आणि खोली क्रमांक १२ मध्ये पर्रिकर वर्षभर वास्तव्यास होते. संघाचे वरळी विद्यार्थी विस्तारक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. दहावी झाल्यानंतर वर्षभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करण्यासाठी पर्रिकर बीडीडी चाळीत वास्तव्यास होते. वरळीच्या अभ्यास गल्लीतही त्यांनी अभ्यास केला होता. 

कर्करोगाने ग्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी निधन झाले. गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर अतिशय साधे होते. एक नेता कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक देखील होते. ६३ वर्षाच्या कार्यकाळात ते ४ वेळा गोव्याचे मुख्यमंत्री होते. मनोहर पर्रिकर १९९४ मध्ये राजकारणात आले. भाजप उमेदवार म्हणून त्यांनी पहिली निवडणूक लढवली. पणजी विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले.