व्यवसाय 5 पटीनं कसा वाढवाल? समजून घ्यायचं असेल तर ही मुलाखत नक्की पाहा

शनिवारी रात्री 9.00 वाजता झी  बिझनेसचे मॅनेजिंग एडिटर अनिल सिंघवी यांची विशेष मुलाखत 

Updated: Nov 27, 2021, 07:32 PM IST
व्यवसाय 5 पटीनं कसा वाढवाल? समजून घ्यायचं असेल तर ही मुलाखत नक्की पाहा

मुंबई: तुमच्यामध्ये हिम्मत असायला हवी. नुसती हिम्मत नाही तर एक स्वप्न बघण्याची हिम्मत हवी. अशी स्वप्न जी झोपू देत नाहीत. अशी जोखीम उचलण्याची हिम्मत आपल्यात असायला हवी. हे शब्द आहेत झी बिझनेसचे मॅनेजिंग एडिटर अनिल सिंघवी याचे. 

झी 24 तास नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करत असतं. त्यातील सर्वोत्तम आणि वेगळा म्हणजे मराठी लीडर्स. ज्यामध्ये शून्यातून विश्व निर्माण केलेल्या दिग्गज लोकांपासून ते अगदी उत्तम व्यवसाय करणाऱ्या मराठी उद्योजकापर्यंत. वेगवेगळ्या लोकांचे अनुभव आणि पैलू प्रक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं श्रेय या निमित्ताने झी 24 तासचे मुख्य संपादक निलेश खरे यांना. 

शनिवारी रात्री 9.00 वाजता झी बिझनेसचे मॅनेजिंग एडिटर अनिल सिंघवी यांची विशेष मुलाखत तुम्हाला पाहता येणार आहे. हीच मुलाखत रविवारी 10.30 वाजता पुन्हा एकदा पाहता येणार आहे. नेहमी अनिल सिंघवी यांना शेअर आणि स्टॉक मार्केटमधील घडामोडींवर बोलताना अनेक जण ऐकत असतील.

मराठी लीडर्सच्या निमित्ताने त्यांचा प्रवास आणि एकूणच सध्याची शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबची परिस्थिती ते गुंतवणुकीची जोखीम अशा वेगवेगळ्या पैलूंवर ही मुलाखत होणार आहे. कौटुंबिक व्यवसायाला कसं जागतिक रुप द्यायचं आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये व्यापाराच्या नव्या वाटा आणि नव्या दिशा कोणत्या आहेत. 

याशिवाय लोकांनी IPO कडे कसं वळायचं या सगळ्या मुद्द्यांवर अगदी सविस्तर ही मुलाखत आहे. त्यामुळे पाहायला विसरू नका ही विशेष मुलाखत शनिवारी रात्री 9 वाजता आणि रविवारी सकाळी 10.30 फक्त झी 24 तासवर.