Top Trending Shares : शेअर मार्केटमध्ये आजकाल माझगांव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअर्समध्ये झपाट्याने उसळी पाहायला मिळत आहे. Mazagon Dock Shipbuilders हे देशातील सर्वात मोठ्या शिपबिल्डिंग यार्डांपैकी एक आहे. संरक्षण क्षेत्रातील ही सरकारी कंपनी भारतीय नौदलासाठी युद्धनौका बनवते. माझगांव डॉक शिपबिल्डर्सने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. त्यामुळे तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर मोठी संधी आहे.
या एका वर्षात बीएसई 500 इंडेक्समध्ये टॉप गेनर्समध्ये समाविष्ट असलेल्या Mazagon Dock Shipbuilders या कंपनीच्या शेअर्समध्ये 272 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शेअर मार्केट अभ्यासकांच्या मते, येत्या काही दिवसांत या कंपनी शेअर्समध्ये मोठी वाढ होऊ शकते. 9 जून रोजी शेअर 2.71 टक्क्यांच्या वाढीसह 1033.90 रुपयांवर बंद झाला. BSE वर त्याचा 52 आठवड्यांचा नीचांक 229.65 रुपये आहे, जो जवळपास एक वर्षापूर्वी 20 जून 2022 रोजी हा स्तर गाठला होता.
तसेच ही कंपनी आपल्या परदेशी ग्राहकांसाठी मालवाहू जहाजे, प्रवासी जहाजे, कार्गो शिप, बहुउद्देशीय जहाजे आणि पाण्याचे टँकर देखील तयार करते. या कंपन्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून अनेक नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत. अशा स्थितीत येत्या काळात माझगाव डॉक लिमिटेडसह संरक्षण क्षेत्रातील समभागांमध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. आर्थिक वर्ष 2023 साठी, Mazagon डॉक खूप चांगले मानले जात शकते. या वर्षी कंपनीच्या महसुलात 37 टक्के तर नफ्यात 83 टक्के वाढ झाली आहे.
Mazagon Dock Shipbuilders कडे 31 मार्च 2023 पर्यंत सुमारे 38,755 कोटी रुपयांची ऑर्डर बुक आहे. ज्यामध्ये शिपबिल्डिंग, पाणबुडी आणि हेवी इंजिनिअरिंग विभागाच्या ऑर्डरचा समावेश आहे. जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 105 टक्क्यांनी वाढून 326.19 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत 159.01 कोटी रुपये होता.
दरम्यान, कंपनीचा महसूल 48.85 टक्क्यांनी वाढला, जो 2,078.59 कोटी रुपये आहे. एका वर्षापूर्वी ते 1,396.43 कोटी रुपये होते. तज्ज्ञांच्या मते, अल्पावधीत Mazagon Dock Shipbuildersचा शेअर 1,100 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
(Disclaimer: कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ZEE 24 TAAS तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)