मुंबई : अंधेरीच्या एमआयडीसी परिसरातून बेपत्ता झालेल्या ४५ वर्षीय महिलेचा आरेच्या जंगलात मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडाली होती. शारजाबाई खोतकर असं मृत महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी आरे पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत चार आरोपींना बेड्या ठोकल्या.
यातील दोन आरोपी हे खोतकर काम करता असलेल्या इमारतीचे सुरक्षारक्षक आहेत. हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय.पोलिसांनी आरोपीला एमआयडीसी परिसरातून अटक केली. मुख्य आरोपी सतेंद्र सिंगनं महिलेला कामानिमित्त बोलवालं आसल्याचं समजलं आणि नंतर हत्या करण्यात आली.