मुंबई : मुंबई महानगर प्राधिकरण तर्फे आज मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. त्याचे उदघाटन केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या संयुक्त उपस्थित झाले. मुंबईची मोनोरेल ही जपानच्या ओसाका मोनोरेल नंतर जगातील दुसरी सर्वात लांब मोनोरेल आहे. जपानच्या ओसाका मोनेरेलची लांबी 23.8 किमी आहे मुंबई मोनोरेलची लांबी 19.54 किमी आहे. मोनोरेलचा पहिला टप्पा चेंबूर पासून वडाळा पर्यंत पूर्वी पासून सुरू आंहे मात्र दुसऱ्या टप्प्याचा आज उदघाटन करण्यात आला आहे. दुसरा टप्पा हा वडाळा पासून संत गाडगे महाराज चौक पर्यंत राहणार आहे. त्यात जिटीबी नगर , अॅण्टॉप हिल , आचार्य अत्रे मार्ग ,वडाळा ब्रीज , दादर पूर्व, नायगाव, आंबेडकर नगर , मिंट कलोनी, लोअर परेल आणि शेवटचे स्थानक संत गाडगे महाराज चौक आहे. एकूण 19.54 किलोमीटर चा मोनोचा हा प्रवास उद्यापासून सर्वसामान्य लोकांसाठी खुला होणार आहे. ट्रेनच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमरा संपर्क सुविधा राहणार असून रीजनरेटीव्ह ब्रेक असणार आहे त्याने 25 % विद्युत वाचणार आहे.
मोनोमुळे वाहतूक कोंडी कमी होत प्रदूषण रोखले जाऊ शकते तर पूर्वी 9 की मी चा मार्ग चेंबूर ते वडाळाचा मार्ग जॉय राईड होता. आता 30 लाख प्रवासी एका महिन्यात मोनोचा फायदा घेतील आणि तोट्यात सुरू असलेल्या मोनोला फायदा होईल. यामध्ये लवकरच इंटिग्रेटेड तिकीट प्रणाली सुरू केली जाईल. यातून एका तिकिटावर रेल्वे, मोनो आणि मेट्रो आणि बेस्ट बस चा प्रवास करता येणार आहे.