MPSC परीक्षा घोटाळा प्रकरणी आणखी एक अटकेत

एमपीएससी घोटाळा प्रकरणी आणखी एका शासकीय अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 19, 2018, 02:37 AM IST
MPSC परीक्षा घोटाळा प्रकरणी आणखी एक अटकेत title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : एमपीएससी घोटाळा प्रकरणी आणखी एका शासकीय अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आऱोपींची संख्या आता १० झाली आहे, भायखळा पोलिसांनी ही अटक केली, कर सहाय्यक अधिकारी गोविंद चेमबोले याला माझगाव येथून अटक करण्यात आली.

डमी बनून दिली दुसऱ्याची परीक्षा

विक्रीकर निरीक्षक संदीप भुसारी याने डमी म्हणून चेमबोलेसाठी परीक्षा दिली होती. मुंबईत ३१ डिसेंबरला झालेल्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत दुसर्‍यासाठी डमी बसल्याप्रकरणी संदीप भुसारीला मागील आठवडय़ात अटक झाली आहे.

आतापर्यंत राज्यभरात एकूण १५ जणांना अटक

MPSC परीक्षा घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत राज्यभरात एकूण १५ जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबईत ३१ डिसेंबरला झालेल्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी ५ जण अटकेत आहेत.

तरूणाने काढला घोटाळा बाहेर

अटक करण्यात आलेल्यांमध्ये अनेक उच्च पदस्थ शासकीय अधिकारी देखील आहेत. हा भरती घोटाळा नांदेड येथील धाडसी तरुण योगेश जाधव याच्या पाठपुराव्यामुळे उघडकीस आला आहे.