Anant-Radhika Wedding : आशियाईतील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबांनी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानीचा (Anant-Radhika Wedding Update) शुक्रवारी म्हणजे 12 जुलैला राधिका मर्चंटशी विवाह संपन्न होणार आहे. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटमध्ये (Jio World Center) जगातील हा सर्वात महागडा विवाहसोहळा पार पडणार असून यासाठी देश-विदेशातील अनेक VVIP पाहुणे आणि सेलिब्रेटी दाखल झाले आहेत. या विवाह सोहळ्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला असून लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना कोट्यवधीचं रिटर्न गिफ्टही दिलं जाणार आहे.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
मुंबईत होणाऱ्या या विवाह सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अंबानी कुटुंबातील सर्व सदस्य लग्नात Z प्लसे सिक्युरिटीसह उपस्थित असणार आहेत. यादरम्यान इंटीग्रेटेड सिक्योरिटी ऑपरेशन सिस्टम (ISOS) सेटअप असणार आहे. ISOS सेंटर सोहळ्यादरम्यान संपूर्ण सुरक्षाव्यवस्थेवर लक्ष ठेऊन असणार आहे.
आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था
या सोहळ्यासाठी खास आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे. 200 आंतरराष्ट्रीय सुरक्षा रक्षत तैनात करण्यात आले आहे. 100 हून अधिक ट्रॅफिक पोलीस आणि मुंबई पोलिस बीकेसीमध्ये तैनात असणार आहेत. शिवाय 60 जवानांच्या या विशेष सुरक्षेत 10 NSG कमांडो आणि पोलीस अधिकारी असणार आहेत.
काय असणार मेन्यू?
अनंत-राधिकाच्या लग्नासाठी 10 हून अधिक आंतरराष्ट्रीय शेफना बोलवण्यात आलं आहे. इंडोनिशियाची कोकोनेट कॅटरिंग कंपनी 100 हून अधिक नारळापासून बनवलेल्या डिश बनवणार आहे. 2500 हून अधिक डिशेस मेन्यू लिस्टमध्ये आहेत. यात काशीचा प्रसिद्ध चाट, मद्रास कॅफेची फिल्टर कॉफी, इटालियन आणि यूरोपियन स्टाईल खाद्यपदार्थांचाही समावेश असणार आहे. इंदौरचे गराडू चाट, मुंगलेट आणि केसर क्रीम वड्याचाही समावेश आहे. देशातील विविध राज्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ आकर्षणाचा विषय असणार आहे.
पाहुण्यांना मिळणार रिटर्न गिफ्ट
विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या सेलिब्रेटी आणि VVIP पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून करोडो रुपयांची घड्याळं दिली जाणार आहेत. इतर पाहुण्यांना काश्मिर, राजकोट आणि वाराणसीहून मागवलेल्या विशेष भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. बांधनी दुपट्टा आणि साडी बनवणाऱ्या विमल मजीठिया यांना 4 महिन्यांपूर्वी भेटवस्तू तयार करण्याची ऑर्डर देण्यात आली आहे. विमलने एकूण 876 दुपट्टे आणि साड्या पाठवल्या आहेत.
याशिवाय बनारसी फ्रॅब्रिकची बॅग आणि खऱ्या जरीपासून तयार केलेली साडीही रिटर्न गिफ्ट म्हणून पाहुण्यांना दिली जाणार आहे. करीमनगरच्या कारागिरांकडून बनवण्यात आलेली चांदीची कलाकृतीही पाहुण्यांना दिली जाणार आहे. याआधी अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून लुई विटॉनची बॅग, सोन्याची चैन, स्पेशल कॅंडल्स आणि डिझायनर फुटवेअर देण्यात आले होते.