Breakfast साठी तुम्हाला ब्रेड हवाय? थांबा, आधी ही बातमी पाहा

ब्रेड ऑम्लेट पासून ब्रेड बटरपर्यंत.... 

Updated: Jan 11, 2022, 10:06 AM IST
Breakfast साठी तुम्हाला ब्रेड हवाय? थांबा, आधी ही बातमी पाहा  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : आज नाष्टयाला काय, असा प्रश्न विचारला असता सँडविच, ब्रेड जॅम, ब्रेड बटर अशीच अनेकांची उत्तरं असतात. प्रत्येकजण त्यांच्या परीनं हा ब्रेड खाणं पसंत करतो. त्यातही ब्रेडचे बहुविध प्रकारही अनेकांच्याच आवडीचे. मुख्य म्हणजे मुंबईत अवघ्या 20 ते 25 रुपयांचं सँडविच खाऊन पोट भरणारेही अनेक. 

याच ब्रेड खाणाऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची बातमी. कारण या बातमीचा थेट त्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. 

अर्थात स्लाईस ब्रेडच्या किंमती आता 2 ते 5 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. 

सर्वच कंपन्यांच्या ब्रेडचे दर तब्बल 15 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. 

इंधन दरवाढ, गॅस दरवाढ या साऱ्याचे थेट परिणाम ब्रेडच्या दरांवर झाले आहेत. ब्राऊ ब्रेडही 3 ते 5 रुपयांनी महागला आहे. 

देशात आलेल्या महागाईचे परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या खाण्यापिण्याच्या ताटावरही होताना दिसत आहेत. 

व्हिब्स, ब्रिटानीय़ा यांसारखे ब्रेड आता महागले असून, आता 45 रुपयांचा ब्रेड 50 रुपयांवर पोहोचलला आहे. 

मुख्य म्हणजे ब्रेड महागल्यामुळं त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांवरही याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत. 

त्यामुळं ब्रेड असणाऱ्या पदार्थांचे दरही निश्चितच वाढणार यातच शंका नाही.