Mumbai Traffic Updates in Marathi : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. त्यातच आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जुनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून धडकणार आहे. याचपार्श्वभूमीवर दरवर्षी महापालिकेकडून मुंबईतील पावसापूर्वी कामाचा आढावा घेण्यात येतो. यामध्ये मुंबई (Mumbai) पूर्व उपनगरे आणि शहर यांच्यातील महत्त्वाचा पूल असणाऱ्या परळ टीटी उड्डाणपूलाच्या डागडुगीचे काम मुंबई महापालिकेच्या पूल विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी पावसाळ्यातील कामांसाठी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकांवर जोडणीचे सांधे (एक्स्पान्शन जॉइंट) भरण्यासह रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या उड्डाणपुलावर दुचाकी आणि अवजड वाहनांना 1 जूनपासून बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.
पावसाळ्यामध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून परळ टीटी उड्डाण पूलावरील खड्डे दुरुस्त करण्याच्या कामाला सुरुवात केली. अवजड वाहनांमुळे या पुलावर दरवर्षी पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडतात. तसेच अवजड वाहनांना मज्जाव करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मुंबई वाहतूक पोलिसांकडून मिळाले आहे. त्यामुळे परळ टी टी उड्डाणपूलाच्या आधी आठवड्याभराच्या कालावधीत अवजड वाहनांना प्रवेश बंदी करणारा हाईट बॅरियर लावण्यात येणार आहे. या ठिकाणी 2.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. हे काम 31 मे पर्यंत करण्यात येईल, अशी माहिती पूल विभागाकडून देण्यात आली.
वाचा: महाराष्ट्रात आता तरी स्वस्त होणार का पेट्रोल-डिझेल? पाहा आजचे दर
तसेच मुंबई महापालिकेच्या डिलाईड रोड (लोअर परळ) उड्डाणपूलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लोअर परळच्या उड्डाण पूलाचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर परळ टी टी उड्डाण पूलाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या पूलाच्या सक्षमीकरणाच्या कामासाठीचे वर्क ऑर्डर पूल विभागाकडून देण्यात आली आहे.
- वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून सध्या रात्रीच्या वेळी या पुलावर दुरुस्ती व देखभालीचे काम सुरू आहे.
- वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत खड्डे भरणे व सांधे भरण्याचे काम सुरू आहे. हे काम 31 तारखेपर्यंत पूर्ण होईल.