शिवाजी कर्डिलेंच्या हकालपट्टीची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळली

अटकेत असलेल्या भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंच्या हकालपट्टीसाठी आता शिवसेना आक्रमक झाली आहे.

Jaywant Patil Updated: Apr 10, 2018, 03:25 PM IST

अहमदनगर : अहमदनगरमध्ये झालेल्या हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेल्या भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंच्या हकालपट्टीसाठी आता शिवसेना आक्रमक झाली आहे. आज शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. पण शिवाजी कर्डिलेंना पक्षातून काढण्यात येणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी शिवसेना मंत्र्यांना स्पष्ट केलंय. कॅबिनेटच्या बैठकीआधी शिवसेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटेले. या विषयावर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला सौम्य भूमिका घेण्याच्या केल्या सूचना केल्या. 

तसेच शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना दिलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

रामदास कदम, सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे यांचा समावेश होता. शिवाजी कर्डिलेंना अहमदनगरमधल्या दुहेरी हत्याकांडप्रकरणात काल अटक करण्यात आली आहे.  त्यांना एक दिवसाची कोठडी देण्यात आली होती. आज ही कोठडी संपणार आहे.