मुंबई : मुंबईत आज अपघाताची मालिका सुरू असल्यासारखा दिवस आहे, सकाळी मुसळधार पावसामुळे अंधेरी रेल्वेलाईनवरून जाणाऱ्या पुलाचा भाग, रेल्वेलाईनवर कोसळला, यात ४ जण जखमी झाले. तर कमला मिलमध्येही शॉर्टसर्किंटमुळे आग लागली असल्याचं सांगण्यात येत आहे. यातही कोणतीही जिवित हानी नाही.
पण यानंतर वांद्रेहून कलिनाला जाणाऱ्या डबल डेकर बसच्या छप्परला रेल्वेचं रेलिंग लागून बसचं छप्परंच उखडलं. यात कुणीही जखमी झालं नाही. पण आज सकाळपासून चाकरमान्यांची मुंबईत अनेक ठिकाणी दैना झाली. प्रत्येक पावसाळ्यात मुंबईकरांना अडचणींचा सामना करावाच लागतो, हे पुन्हा एकदा दिसून आलं.