MHADA : म्हाडाची 35- 45 लाख रुपयांत मिळणारी म्हाडाची घरं कशी आहेत? VIDEO पाहून तुम्ही नक्कीच अर्ज भराल

Mhada Lottery 2023 in Marathi :  सध्या सर्वसामान्यांने म्हाडा लॉटरी 2023 च्या नोंदणी प्रक्रियेत लागले आहेत. अशातच ज्या घरांसाठी तुम्ही अर्ज करत आहात ते दिसतात कसे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. 

Updated: Feb 14, 2023, 03:32 PM IST
MHADA : म्हाडाची 35- 45 लाख रुपयांत मिळणारी म्हाडाची घरं कशी आहेत? VIDEO पाहून तुम्ही नक्कीच अर्ज भराल title=
mumbai goregaon pahari How 35 lakh and 45 lakh houses look like mhada Home mhada lottery 2023 Trending Video viral on Social media

Mhada Mhada Home Look Video :  काय मुंबईकर (mumbai news) तुम्ही म्हाडाच्या (mhada lottery 2023 mumbai) घरांसाठी नोंदणी केली का?  (mhada lottery 2023 registration) कारण तुमचं घराचं स्वप्न पुढच्या महिन्यात पूर्ण होणार आहे. मुंबईतूल म्हाडाची लॉटरी मार्चमध्ये (mhada lottery 2023 in goregaon) निघणार आहे. मुंबई मंडळाच्या सुमारे 4 हजार घरांपैकी 2 हजार 600 घरं ही गोरेगाव पहाडी परिसरात आहेत. विशेष म्हणजे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटांसाठी ही घरं बांधली जात आहेत. यातील अत्यल्प उत्पन्न गटातील घरांची अंदाजे किंमत 35 लाख रुपये आहे. गृहनिर्माण बाजारपेठेत याच घरांची किंमत अंदाजे 70 लाखांच्या आसपास असल्याचं सांगितलं जातं. (MHADA Lottery 2023 )  ही घरं आतून दिसतात कशी तुम्हाला पाहायची आहेत का? चला आज आम्ही तुम्हाला या घरांची झलक दाखवणार आहोत. (register for MHADA lottery 2023)

45 लाखाचं घर कसं दिसतं?

 गोरेगाव पहाडी परिसरात अल्प उत्पन्न गटासाठी 736 घरं बांधली जात असून ही घरं 482 चौरस फुटांची आहेत. या घराची अंदाजे किंमत 45 लाख आहे. तुम्ही या घरासाठी अर्ज भरत असाल तर नक्की भरा. (mumbai goregaon pahari How 35 lakh and 45 lakh houses look like mhada Home mhada lottery 2023 Trending Video viral on Social media)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

35 लाखाचं घर कसं दिसतं?

गोरेगाव पहाडी परिसरात अत्यल्प उत्पन्न गटासाठी 1 हजार 947 घरांचा समावेश आहे. ही घरं 322 चौरस फुटांची असून त्याची अंदाजे किंमत 35 लाख रुपयांपर्यंत आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्या हक्काचं घर असावं. मुंबईतील घरांची किंमत दिवसेंदिवस वाढतं आहे. अशात म्हाडाकडून बांधण्यात आलेले हे प्रकल्प त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Varun Singh (@s1nghvarun)

सोशल मीडियावर म्हाडाची ही घरं इन्स्टाग्रामवरील अकाऊंट s1nghvarun वर पोस्ट करण्यात आले आहेत. त्यानंतर हे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतो आहे. ही घरी पाहून तुम्ही नक्कीच अर्ज भरणार यात शंका नाही.