मुंबईत घर हवंय! म्हाडाची लॉटरी लवकरच येतेय...!

म्हाडाच्या घरांसाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे.

Updated: Jun 5, 2018, 12:53 PM IST

मुंबई : तमाम मुंबईकर दर वर्षी ज्याची आतुरतेनं वाट पाहातात, त्या म्हाडाच्या घरांसाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. मुंबईतील घरांसाठी पुढच्या महिन्यात म्हा़डा ही जाहिरात म्हाडा प्रसिद्ध करणार आहे. विविध गटांसाठी एक हजार घरांचा त्यामध्ये समावेश असणार आहे. या वर्षी अत्यल्प गटासाठी ८००, मध्यम गटासाठी २०० घरे ठेवण्यात आली आहेत. म्हाडाच्या या घरांसाठीचं नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचं म्हाडाच्या सुत्रांनी सांगितलं आहे. खालील ठिकाणी म्हाडाची घरं असणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

१) बोरिवली - महावीर नगर  
२)  कन्नमवार नगर - विक्रोळी
३) घाटकोपर - कन्नमवार नगर 
४) मुलुंड गव्हाणपाडा 
५) गोरेगाव, 
६) मानखुर्द, 
७) अँटॉप हिल