मुंबई टू गोवा समुद्र सफारीचा आनंद क्रुझमधून लुटा । Video

मुंबई ते गोवा असा समुद्र सफारीचा आनंद तो सुद्धा क्रुझमधून आता लुटता येणार 

Updated: Oct 17, 2018, 11:32 PM IST
मुंबई टू गोवा समुद्र सफारीचा आनंद क्रुझमधून लुटा । Video title=

मुंबई : मुंबई ते गोवा असा समुद्र सफारीचा आनंद तो सुद्धा क्रुझमधून आता लुटता येणार आहे. ' सी इगल क्रुझेज ' ही समुद्र सफारीची सेवा देणारी कंपनी मुंबई ते गोवा दरम्यान ' आंग्रिया ' या क्रुझद्वारे सेवा सुरु करत आहे. येत्या 20 तारखेला मुंबईहून गोव्यासाठी प्रवाशांना घेऊन पहिल्यांदा आंग्रिया प्रवासाकरता निघणार आहे. 

मुंबईहून संध्याकाळी 4 च्या सुमारास निघाल्यावर दुस-या दिवशी सकाळी 9 च्या सुमारास ही क्रुझ गोव्याला पोहचणार आहे. तर परतीचा प्रवास गोव्याहून 4 नंतर सुरु होणार असून ही क्रुझ दुस-या दिवशी मुंबईत भाऊच्या धक्क्याला 9 च्या सुमारास पोहचणार आहे. एक दिशेच्या प्रवास शुल्काची सुरुवात ही फक्त साडेसहाजरपासून आहे.