तुम्ही म्हणाल, आता सेल्फीचं हेच राहिलं होतं

 सेल्फी काढण्यासाठी ना ना तऱ्हा आल्या, यात सेल्फी स्टीक एक आहेच...पण..

Updated: Oct 26, 2017, 08:16 PM IST

मुंबई : सेल्फीचा मोह अगदी लहान बालकांपासून तरूण ते आजी आजोबांनाही आता आवरता येत नाही. सेल्फी काढण्यासाठी ना ना तऱ्हा आल्या, यात सेल्फी स्टीक एक आहेच.

पण आता सेल्फीचे आणखी प्रकार वाढले आहेत, यात काही कमी होतं म्हणून की काय, पण पुन्हा कॅमेरा आपल्या बुटात अडकवून फोटो काढता येऊ शकतो. 

फोन बुटाला अडकविण्यासाठी इलॅस्टीक बँडची उत्तम सोय करण्यात आली आहे, फोन खाली पडण्याची शक्यता नाही.

आता फोनला हात कसा लावणार तर यासाठी रिमोट देण्यात आला आहे. केवळ पाय वर केल्यास आपण सहज आपला फोटो काढू शकतो.

 या डिव्हाईसचे 'सेल्फी फीट' असे नाव आहे. सध्या हा डिव्हाईस ऑनलाईन उपलब्ध आहे, त्याची किंमत १६०० रुपये आहे. 

या डिव्हाईस तुम्हाला तुमच्या घड्याळावरही लावता येऊ शकते. त्यामुळे तुमचे वेगवेगळ्या पोजमधले फोटो तुम्ही अगदी सहज काढू शकता. 

या सेल्फी फीटला लोहचुंबकही देण्यात आले आहे. त्यामुळे एखाद्या लोखंडी वस्तूवर तुम्ही आपला फोन लावूनही फोटो काढू शकता.