पालिका शाळेत लोहाच्या गोळ्यांतून विषबाधा, विद्यार्थीनीचा मृत्यू

लोहाच्या गोळ्यांतून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची शक्यता 

Updated: Aug 10, 2018, 02:11 PM IST

 

मुंबई : मुंबईतल्या गोवंडीतील महापालिकेच्या संजयनगर ऊर्दू माध्यम शाळा वादात सापडलीय. या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून चांदनी शेख या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय... तर, खबरदारी म्हणून जवळपास १७० विद्यार्थ्यांवर सायन आणि घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैंकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. 

महापालिकेच्या या शाळेत दिल्या गेलेल्या लोहाच्या गोळ्यांतून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सोमवारी शाळेत विद्यार्थ्यांना लोहाच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर या मुलांना मळमळ आणि उलट्या झाल्या. काही मुलांना तर रक्ताच्या उलट्या होवू लागल्यानं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. 

यापैंकी एका मुलीचा मृत्यू झालाय.... तर आता १७० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून चार विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पालिकेच्या शिक्षण आणि आरोग्य विभागाची टीम शाळेत दाखल झाली आहे.