मुंबई : एका बाजूला सत्तास्थापनेसाठी उशीर होत असल्यानं अमरावतीचे आमदार बच्चू कडू यांनी मंत्रालयाबाहेरच आपलं कार्यालय सुरु केलं आहे. आज बच्चू कडु यांनी मंञालयाबाहेर बसून जनतेच्या समस्या सोडवायला सुरुवात केली.
तक्रार घेवून मंञालयात आलेल्या लोकांना बच्चू कडू भेटतायत. त्यांचे निवदेन स्वीकारतायत. राज्यभरात शेतकरी वर्ग मदतीची मागणी करत असताना सरकार स्थापन करायला माञ उशीर केला जात आहे.
अशात बच्चू कडू यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये कामाला सुरुवात केलीय असं म्हणायला हरकत नाही.
आमदार बच्चू कडू हे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच पुढे असतात. जे अधिकारी आठमुठेपणाचं धोरण घेऊन बसतात. कोणतंही काम करायला धजावत नाहीत, किंवा पैशांमुळे कामं अडवून ठेवतात, अशांना बच्चू कडू हे धडा शिकवतात.
बच्चूकडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. बच्चू कडू यांच्याविषयी सर्वसामान्य जनतेच्या मनात आदराची भावना आहे, यामुळे बच्चू कडू हे महाराष्ट्रातील सर्व स्थरातील जनतेते लोकप्रिय आहेत.