सरकार सुडाने पेटले... दरेकर असे गरजले

सरकारच्या माध्यमातून मुंबई पोलिसांवर दबाव आणला जात आहे. विरोधी पक्षांच्या लोकांवर पोलिसांमार्फत दहशतवाद.. 

Updated: Apr 27, 2022, 07:01 PM IST
सरकार सुडाने पेटले... दरेकर असे गरजले title=

मुंबई : सरकारच्या माध्यमातून मुंबई पोलिसांवर दबाव आणला जात आहे. विरोधी पक्षांच्या लोकांवर पोलिसांमार्फत दहशतवाद निर्माण केला जात आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Pravin darekar ) यांनी केला. 

किरीट सोमय्या ( Kirit somaiya ) यांच्या गाडीवर हल्ला केला. फर्जी एफआयआर नोंदविला गेला. तो अपलोड करून घटनाक्रम सांगितलं गेला. ५० ते ६० जणांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. मात्र, त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याऐवजी त्यांच्या ड्राइव्हरवरच एफआयआर नोंदविला गेला. 

५० जणांवर गुन्हे दाखल होणे गरजेचे होते. पण, महाडेश्वर आणि अन्य नगरसेवक यांच्यावर गुन्हा नोंदवला. हे सर्व मुंबई पोळी आयुक्त यांच्या आदेशानुसार झाले. सोमय्या यांना सिक्युरिटी असतानाही त्यांच्यावर हल्ला होत असेल तर तर सामान्य जनतेचे काय? असा सवालही त्यांनी केला.

मुख्यमंत्री यांच्यावर संविधानाने जी जबाबदारी दिली आहे ती पार पाडण्यात राज्याचे प्रमुख अपयशी ठरले आहेत. आम्ही कायद्यावर विश्वास ठेवणारे आहोत. त्यामुळे गृह सचिव यांनी या घटनेचा अहवाल मागवावा, अशी मागणीही त्यांनी केली.

जे या सरकारचे घोटाळे बाहेर काढत आहेत. त्यांना अटक करा, त्यांच्यावर हल्ले करा, त्यांना संपवा असे या सरकारचे धोरण आहे. त्यामुळे हे सरकार न्याय देईल असे वाटत नाही. हे सरकार सुडाने पेटले आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली.