Mega block : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक

रविवारी घराबाहेर पडताय, मग मेगाब्लॉकमुळे बदलेले रेल्वेच वेळापत्रक एकदा पाहून घ्या  

Updated: Jul 23, 2022, 09:00 PM IST
 Mega block : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक title=

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही लोकल मार्गांवर शनिवारी 23 जुलै रात्री आणि रविवारी 24 जुलैला मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही रविवारी घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर मेगाब्लॉकच वेळापत्रक एकदा पाहून घ्या  

रेल्वेच्या पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या ट्रेन्स धावणार आहेत व कोणत्या रद्द करण्यात येणार आहेत याची माहिती जाणून घेऊयात.  

पश्चिम रेल्वे 
पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे ब्लॉक कालावधीत सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर धावणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. ब्लॉक काळात पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल 10 मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे 
मध्य रेल्वे मार्गावर देखील मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या भायखळा - माटुंगा जलद मार्गावर (मध्यरात्री ते सकाळ) दिनांक 23 जुलै 2022 रोजी रात्री 11.30 पासून दिनांक 24 जुलै 2022 च्या पहाटे 4.05 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यानंतर रविवार 24 जुलैला मध्यरात्री 12.40 ते पहाटे 5.40 पर्यंत सुद्धा या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

या गाड्यांचे मार्ग बदलले
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक 24 जुलै 2022 रोजी सकाळी 5.20 वाजता सुटणारी जलद मार्गावरील गाडी भायखळा आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.

ठाणे येथून 23 जुलै रोजी रात्री 10.58 आणि रात्री 11.15 वाजता सुटणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि भायखळा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, त्यांच्या संबंधित निर्धारित थांब्यांनुसार थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटांनी गंतव्यस्थानावर पोहोचतील.

मेल-एक्स्प्रेस गाड्या

ट्रेन क्रमांक12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.

11058 अमृतसर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 11020 कोणार्क एक्सप्रेस आणि 12810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.

हार्बर मार्ग 
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हार्बर मार्गावर पनवेल – वाशी स्थानकात  सकाळी 11.05  ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.  

गाड्या रद्द 
पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45  ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या आणि ठाणे येथून 10.01 पासून दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलकरीता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.