मुंबई : रेल्वे अपघात हा कायमच अंगावर काटा आणणारा असतो. अगदी एका सेकंदात होत्याचं नव्हतं होतं. रेल्वेच्या एका पॉइंटमनने एका चिमुकल्याचा जीव वाचवला आहे. सेंट्रल रेल्वेच्या डिविजनच्या वांगणी स्टेशनवर एक अंध मुलगा प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आईसोबत चालत होता. चालत असताना त्याचा तोल गेला आणि तो ट्रॅकवर पडला. याच दरम्यान ट्रॅकवर एक ट्रेन आली.
मात्र त्याचवेळी पॉइंटमन मयूर शेळकेने आपल्या जिवाची पर्वा न करता मुलाला वाचवलं. सोशल मीडियावर या घटनेचा व्हि़डिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अंगाला थरकाप आणणारा आहे. या व्हिडिओने घटनेचं गांभीर्य किती आहे. हे पाहायला मिळतं.
रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी देखील हा व्हिडिओ शेअर करून मयूर शेळकेचं कौतुक केलंय. हा अंध मुलगा आपल्या आईसोबत चालत होता. त्याची आई देखील अंध होती. त्यामुळे या दोघांना प्लॅटफॉर्मचा अंदार आला नाही. त्या मुलाचा तोल गेला आणि तो खाली कोसळला.
Very proud of Mayur Shelke, Railwayman from the Vangani Railway Station in Mumbai who has done an exceptionally courageous act, risked his own life & saved a child's life. pic.twitter.com/0lsHkt4v7M
— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 19, 2021
या घटनेची सगळीकडे जोरदार चर्चा रंगत आहे. अंध मुलाचे प्राण वाचवल्यानंतर मयुरने स्वतःचा जीव देखील वाचवला. त्यानंतर सगळेचजण खूप जोरात धावत आले.