मुंबई : Sanjay Raut on Assembly election results : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली. या निवडणुकीत भाजपने आपली राज्य पुन्हा आपल्या ताब्यात राखली आहेत. मात्र, पंजाबमध्ये काँग्रेसला हद्दपार करताना 'आप'ने जोरदार मुसंडी मारता सत्ता काबीज केली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. भाजपचा भारी विजय आहे. पंजाबमध्ये 'आप'चा ऐतिहासिक विजय आहे. जे जिंकले त्यांचे अभिनंदन. मात्र, उत्तर प्रदेशमधील लढाई संपलेली नाही, असे संजय राऊत म्हणाले. त्याचवेळी त्यांनी भाजपला टोला लगावला. (Sanjay Raut's reaction to the Assembly election results of five states)
विजय पचवायला शिकले पाहिजे, अजीर्ण झालं की त्रास होतो, असे ते म्हणाले. भाजपवर त्यांनी ज्या प्रकारच्या नोटा वापरल्यात त्यापेक्षा कमी मत मिळालीत. विजय पचवायला शिकलं पाहिजे, अजीर्ण झालं की त्रास होतो सुडाने कारभार न करता लोकशाही पद्धतीने राज्य करा, असा सल्ला भाजपला संजय राऊत यांनी दिला.
उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी काँग्रेसला सोबत घेतले असते तर फायदा नक्कीच झाला असता, काँग्रेसला आपल्या धोरणात जरा बदल करावा लागेल. काँग्रेसला भूमिकेत बदल करावा लागेल. जे निकाल आलेत जिथे फायदा घेता आला असता, तो का घेता आला नाही. निकाल स्वीकारायचा आणि पुढे जायचे, असे राऊत म्हणाले.