सगळ्यांना हिशोब चुकवावा लागेल, संजय राऊत यांचा भाजपला इशारा

Sanjay Raut on  BJP : आम्ही घाबरणार नाही. मनात एक राग आहे. सगळ्यांनाच हिशोब चुकवावे लागेल, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.

Updated: Nov 18, 2021, 11:09 AM IST
सगळ्यांना हिशोब चुकवावा लागेल, संजय राऊत यांचा भाजपला इशारा title=
संग्रहित छाया

मुंबई : Sanjay Raut on  BJP : राजकीय सूडभावनेतून छळ केला जात आहे. ही महाविकास आघाडीची वेदना आहे. आम्ही घाबरणार नाही. मनात एक राग आहे. सगळ्यांना हिशोब चुकवावे लागेल. सत्ता मिळविण्यासाठी केंद्रीय संस्थांचा अमर्यात वापर सुरु आहे. याची किंमत तुम्हाला (भाजप) चुकवावी लागेल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) जे बोलले ती त्यांची चीड, संताप आणि वेदना आहे. सत्तेचा अमर्याद गैरवापर हा लोकशाहीला धरुन नाही, असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. (Sanjay Raut's warning to BJP)

तुमचे चमचामंडळ धुतल्या तांदळासारखे आहे का? 

अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर शरद पवार यांनी मांडलेल्या भूमिकेचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन केले.  पवार यांनी देशमुख यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे समर्थन राऊत यांनी केले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तुमचे चमचामंडळ धुतल्या तांदळासारखे आहे का, असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली.

अनिल परब, प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. तुमच्यामध्ये जे चमचा मंडळ आहे. ते धुतल्या तांदळासारखे आहे का, असा सवाल करत आम्ही तुम्हाला घाबरत नाही. आमच्याकडे पाप करण्यासारखे काहीही नाही. तुम्ही पापी लोकं. बुरखे घालून फिरत आहात. आमच्यावर आरोप करत आहात. चिखलफेक करत आहात. याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. याआधीही मी म्हटलं आहे, जो आम्ही त्रास भोगला आहे, त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल, कोणाला माफ असणार नाही, असा गंभीर इशारा यावेळी संजय राऊत यांनी दिला.

शरद पवार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये पाठवले त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची चीड संताप आणि वेदना आहे. चिडीतून निर्माण झालेला सरकार आहे. सत्तेसाठी काहीही करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनाचा गैरवापर सुरू आहे. पवार कुटुंब, आम्ही सगळे, भुजबळ यांना जेलमध्ये जावे लागले. याची भरपाई कोण करणार, प्रत्येक पापाची किंमत चुकवावी लागेल, असे राऊत म्हणाले.

आमच्यावर आरोप केले ते कसे पळून गेलेत?

परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केले. आता आमच्यावर आरोप केले ते कसे पळून गेलेत. केंद्रीय यंत्रणांनी त्यांना पळवून लावले का, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. दरम्यान, 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या प्रकरणावर  शरद पवार पहिल्यांदाच उघडपणे बोलले. याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह बेपत्ता झाल्याचे त्यांनी सांगितले. अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यापासून ते बेपत्ता आहेत. आता ते आरोप सिद्ध करण्यासाठी पुढे येत नाहीत. भाजपावर हल्लाबोल करताना अनिल देशमुख यांना तुम्ही तुरुंगात टाकले, परमबीर सिंग फरार आहेत. तुम्ही जे काही केले असेल त्याची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल, असे शरद पवारांनी म्हटले आहे.