शिवसेना नेते संजय राऊत यांना आज डिस्चार्ज

 शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार

Updated: Nov 13, 2019, 08:34 AM IST
शिवसेना नेते संजय राऊत यांना आज डिस्चार्ज  title=

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. दुपारी १२ च्या सुमारास त्यांना घरी जाता येणार आहे. रविवारी संजय राऊत यांना अचानक छातीत दुखू लागल्यामुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच रात्री त्यांच्यावर एन्जिओप्लास्टीही करण्यात आली. सोमवारी दिवसभर राऊतांची विचारपूस करण्य़ासाठी सर्वच पक्षातील दिग्गजांनी लिलावती गाठले. अखेर आज राऊतांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांची लिलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. राऊतांची प्रकृती उत्तम असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळेल असं शिंदे यांनी सांगितले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे नातू रोहित पवार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राऊतांची लिलावतीत भेट घेऊन विचारपूस केली. 

काँग्रेसमधून भाजपत गेलेले हर्षवर्धन पाटीलांनीही राऊतांची विचारपूस करण्यासाठी लिलावती रुग्णालय गाठले. युती तुटली असली, सत्तेचा पेच कायम असला तरी जवळपास सर्वच पक्षांचे नेते लिलावतीमध्ये दिसत आहेत. मग त्यात भाजपही मागे नाही. संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरेंच नाही तर भाजपचे आशिष शेलारही पोहोचले.