अय्या किती गोड! मुकेश अंबानींच्या नातीचं अर्थपूर्ण नाव जगासमोर

Akash Ambani and Shloka Amabni Daughter: आकाश आणि श्लोका अंबानी यांना कन्यारत्न झाले. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. नुकतंच त्यांनी त्यांच्या लेकीचे नावं ठेवले आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 10, 2023, 05:24 PM IST
अय्या किती गोड! मुकेश अंबानींच्या नातीचं अर्थपूर्ण नाव जगासमोर title=
June 10, 2023 | Shloka Amabani and Akash Amabani names their daughter as veda akash ambani (Photo: Zee News)

Akash Ambani and Shloka Amabni: आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या घरी गोंडस अशा मुलाची जन्म झाला आहे. याबद्दची खुशखबर खुद्द अंबानी कुटुंबियांनी दिली. काही दिवसांपुर्वीच श्लोकाला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून रूग्णालयातून बाहेर पडतानाचे तिचे काही फोटोही कॅमेऱ्यात कैद करण्यात आले होते. त्यामुळे सोशल मीडियावर श्लोकाची चांगलीच चर्चा रंगली होती. यावेळी नातीला कडेवर घेऊन नीता अंबानी गाडीत बसलेल्या दिसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर चांगलेच स्मित होते. आता आकाश आणि श्लोका आपल्या लेकीचे नाव काय ठेवतील? याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा आहे. आकाश आणि श्लोकानं आपल्या लेकीचे नावं ठेवले आहे. त्याबद्दल त्यांनी एक कार्ड प्रसिद्ध केले आहे. 

श्लोका आणि आकाश यांनी त्यांच्या लेकीचे नावं वेदा आकाश अंबानी असं ठेवलं आहे. त्यांनी एक कार्ड प्रसिद्ध केलं आहे की, भगवान श्री कृष्ण की कृपा आणि धीरूभाई व कोकिलाबेन अंबानी यांच्या आशीर्वादाने, पृथ्वी अंबानी यांची छोटी बहीण वेद आकाश अंबानी यांच्या जन्माची घोषणा करण्यात आली आहे. सोबतच त्यांनी परिवारातील अन्य सदस्यांचीही नावं लिहिली आहेत. 

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता कायमच चर्चेत असतात. त्यांच्या लग्नापासून ते चांगलेच चर्चेत आहेत. आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे. ज्याचं नावं आहे पृथ्वी. तोही आता मोठा झाला आहे. पृथ्वीही अनेकदा आपल्या आईवडिलांसोबत स्पॉट होतो. त्यामुळे त्याचीही चांगलीच चर्चा रंगते. ईशा अंबानीच्या जुळ्या मुलींचीही चांगलीच चर्चा रंगताना दिसते. मध्यंतरी ईशाची मुलगी ही मुकेश अंबानी यांच्यासोबत स्पॉट झाली आहे. यावर नेटकऱ्यांनीही तूफान कमेंट्स केल्या. त्यामुळे त्यांचीही अनेकदा चर्चा रंगताना दिसते. 

Shloka Amabani and Akash Amabani names their daughter as veda akash ambani

श्लोका आणि आकाश यांनी आपल्या लेकीचे नाव वेदा असं ठेवलं आहे. या नावाचा अर्थ फारच गोड आहे. या नावाचा अर्थ आहे, ज्ञान. त्यामुळे सध्या या नावाची प्रचंड चर्चा आहे. तुम्हालाही जर का मुलगी झाली तर तुम्हीही तुमच्या मुलीचं नावं हे 'वेदा' ठेवू शकता. 

सध्या स्टारकीड्स हे अनेकदा स्पॉट होताना दिसतात आणि जनमानसात त्यांची प्रचंड चर्चा रंगलेली दिसते.

कधी कोणी पार्टी शार्टीमध्ये बिझी असते तर कोणी आपल्या डेटिंगच्या चर्चांमध्ये परंतु त्यांची चांगलीच चर्चा असते. त्यांना नेटकरी ट्रोलही करताना दिसतात. त्यामुळे मीम्स आणि ट्रोलिंगमुळे त्यांना अक्षरक्ष: हैराण केले जातात.