मुंबई : सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालीय. आज पहाटे पाच वाजल्यापासून १७ फेब्रुवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यामुळे मुंबईकरांची गैरसोय होणार आहे.
सायन उड्डाणपूल दुरूस्तीसाठी बंद
14 फेब्रवारीपासून राहणार बंद
17 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद #SionBridge #closed https://t.co/HOK58cBO5u pic.twitter.com/6aCk8RCZ6Y— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 14, 2020
पुढच्या तीन महिन्यात दुरुस्तीच्या कामासाठी असे आठ ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या काळात उड्डाणपुलाच्या बेअरिंग बदलण्यात येणार आहेत. सायन उड्डाणपुलाचं महत्व लक्षात घेऊन आठवड्यातील चार दिवस या पुलाच्या बेअरिंग बदलण्याचं काम करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यात बेअरिंग बदलल्यानंतर पूल पुढचे वीस दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
पूर्व उपनगरातून मुंबईत प्रवेश करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या सायन उड्डाणपुलाचे काम गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळ रखडले होते. मात्र आता शुक्रवारपासून हे काम सुरू करण्यास येईल. 14 फेब्रुवारी म्हणजे आजपासून ते 6 एप्रिलपर्यंत काम सुरू राहील. एकूण आठ ट्रॅफिक ब्लॉक मुंबई वाहतूक विभागाने मंजुर केले असून पहिला ब्लॉक 17 फेब्रुवारीनंतर घेतला जाईल.