विद्यार्थ्यांकडून केंद्र सरकारचा निषेध; पहाटे चार वाजता मोदींची काकड आरती

विद्यार्थ्यांसाठी 'मन की बात' बोलणारे माननीय प्रधानमंत्री मोदी आज गप्प का आहेत ? 

Updated: Jul 31, 2020, 10:08 AM IST
विद्यार्थ्यांकडून केंद्र सरकारचा निषेध; पहाटे चार वाजता मोदींची काकड आरती title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: राज्यातील पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा रद्द व्हाव्यात. तसेच नवे शैक्षणिक धोरण मागे घेतले जावे, या मागणीसाठी सध्या विद्यार्थी भारती संघटनेकडून आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून यावेळी विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने केंद्र सरकारचा निषेध केला. आज पहाटे चार वाजता या विद्यार्थ्यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काकड आरती केली. पदवी व पदव्युत्तर परीक्षा रद्द करण्यासाठी मोदी व केंद्रीय अनुदान आयोगाला UGC जाग येऊ दे महाराजा, असे गाऱ्हाणे यावेळी विद्यार्थ्यांकडून घालण्यात आले. तसेच पदवी व पदव्युत्तर परीक्षेची युजीसीची सक्ती दूर करावी यासाठी विद्यार्थी भारती आज ४ वाजता करणार बोंब मारा आंदोलन करणार आहे.

मोदीजी... तुमचा निर्णय राफेलपेक्षा भारी, पण आता एवढी काळजी घ्या; शिवसेनेचा सल्ला

विद्यार्थ्यांसाठी 'मन की बात' बोलणारे माननीय प्रधानमंत्री मोदी आज गप्प का आहेत ? त्यांनी यापूर्वी विद्यार्थ्यांबद्दल दाखवलेली आस्था खोटी होती का, असा सवाल विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्ष मंजिरी धुरी यांनी उपस्थित केला.
दुसऱ्या दिवसाच्या पाहिल्या सत्रात मंजिरी धुरी यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू झाले आहे. विद्यार्थी भारती महाराष्ट्र राज्य अध्यक्षा पूजा मुधाने व चिरंजीवी संघटनेच्या राज्यध्यक्षा सलोनी तोडकरी यांनी देखील साखळी उपोषण करत या लढ्याला पाठिंबा दर्शवला आहे. काल उपोषणाच्या पहिल्या दिवशी शिवसेनेचे प्रवक्त राहुल लोंढे व 'मनविसे'चे भिवंडी उपाध्यक्ष परेश चौधरी यांनी उपोषण स्थळी पोहचून या लढ्याला पाठिंबा दिला.  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x