डावी विचारसरणी देशद्रोही, देवधरांचं वादग्रस्त वक्तव्य

डावी विचारसरणी ही देशद्रोही असून डाव्यांना देशातून हद्दपार करण्याची गरज आहे, असं विधान भाजप नेते आणि त्रिपुरा प्रभारी सुनील देवधर यांनी केलंय. 

Updated: Mar 13, 2018, 03:31 PM IST
डावी विचारसरणी देशद्रोही, देवधरांचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : डावी विचारसरणी ही देशद्रोही असून डाव्यांना देशातून हद्दपार करण्याची गरज आहे, असं विधान भाजप नेते आणि त्रिपुरा प्रभारी सुनील देवधर यांनी केलंय. 

'झी २४ तास'ला दिलेल्या रोखठोक मुलाखतीत त्यांनी हे विधान केलंय. त्रिपुराच्या विजयाचे शिल्पकार म्हणून देवधरांची ओळख आहे. 

त्रिपुरातल्या माकपच्या गडाला धक्का देत भाजपची सत्ता आणल्याचं श्रेय देवधरांना जातं. त्यामुळं देवधरांचं हे विधान अधिक महत्त्वाचं आहे.