माणिक, नीलम आणि हिरेजडीत, ४ किलोच्या सोन्याच्या डब्यात चोर जेवत होते....

 हैदराबादच्या निझामच्या म्युझियममधून चोरी विषयी सर्वात महत्वाची बातमी हाती आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या डब्याची ३ ते ५ कोटी रूपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

Updated: Sep 12, 2018, 06:45 PM IST
माणिक, नीलम आणि हिरेजडीत, ४ किलोच्या सोन्याच्या डब्यात चोर जेवत होते.... title=

मुंबई : हैदराबादच्या निझामच्या म्युझियममधून चोरी विषयी सर्वात महत्वाची बातमी हाती आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या डब्याची ३ ते ५ कोटी रूपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. निझामच्या संग्रहालयातून सोन्याच्या डब्याची चोरी झाली होती. या हिरे, माणकं, आणि निलम लावलेल्या डब्यात चोर जेवण करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या चोरांना शोधण्यासाठी पोलिसांच्या २० टीम बनवण्यात आल्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हैदराबादेत हे चोरी केल्यानंतर, हे चोर मुंबईत अलिशान राहत होते. या चोरांना अटक करण्यात आली तेव्हा ते अलिशान हॉटेलमध्ये थांबलेले होते. या ४ किलो सोन्याच्या डब्यात ते जेवण करत होते, या हिरेजडीत या सोन्याची किंमत कोट्यवधी रूपयांच्या घरात असल्याचं समजतंय.

चौकशीत समोर आलं आहे की, संग्रहालयाच्या झरोक्यातून प्रवेश करून २ सप्टेंबर रोजी ही चोरी करण्यात आली होती. लोखंडी सळई तोडून ते संग्रहालयात घुसले होते. संग्रहालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमधून ही बाब समोर आली आहे. चारमिनारजवळच्या सीसीटीव्हीने काही पुरावे समोर आले. 

पुरावे मिळाल्यानंतर मुंबईत चोरांना जेरबंद करण्यात आलं. ते एका अलिशान हॉटेलमध्ये थांबले होते. निझामच्या संग्रहालयात ४५० वस्तू आहेत, त्यांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात २५० ते ५०० कोटी रूपये आहे.

संंबंधित यापूर्वीची बातमी वाचा

हैदराबादच्या निझामाचा सोन्याचा डबा चोरीला, शोध घेण्यासाठी पोलिसांच्या १० टीम

निझामाचा सोन्याचा डबा अमूल्य का? वाचा....

या संग्रहालायला अपुरी सुरक्षा आहे, तसेच सोन्याचा डबा चोरणाऱ्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांच्या १० टीम तपासाच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून सध्या संग्रहालय बंद ठेवण्यात आलं आहे.

या डब्याचं वजन २ किलो आहे, तो माणिक, निलम आणि हिरेजडीत आहे. हा प्राचीन आणि मौल्यवान समजला जाणारा डबा सातवा निझाम - मीर ओसमान अली खान यांचा होता. भारतात विलिन होण्यापूर्वी, हैदराबाद राज्यावर १९११ ते १९४८ पर्यंत मीर ओसमान राज्य करीत होते.

हा बहुमोल निझामाचा सोन्याचा डबा हैदराबादमधील पुरानी हवेलीत होता. हे निझामांचं शहरातील जुन्या जागांपैकी एक आहे.

इतिहासकार, आणि निझामच्या खजिन्याचे अभ्यासक सैफुला यांच्या मते या सोन्याच्या डब्याची बाजारात किंमत ६० लाख रूपये असेल. तसेच त्यावरील विविध कलाकृतींचा विचार केला, तर तो डबा १ कोटी रूपयांचा आहे.