Vada Pav : वाढत्या महागाईचा वडापावला फटका, गरिबांचा बर्गर महागणार?

'गरिबांचा बर्गर' हा शब्दच वडापाव (Vada Pav) आणि गोरगरिबांशी असलेलं नात ठळकपणे नमूद करतो. मात्र आता या वडापावला ही मंहागाईची दृष्ट लागलीय.  

Updated: Nov 2, 2022, 11:26 PM IST
Vada Pav : वाढत्या महागाईचा वडापावला फटका, गरिबांचा बर्गर महागणार?  title=

मुंबई :  वडापाव (Vada Pav), या 4 शब्दांचा पदार्थ गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरिबांपासून ते श्रीमंतांची पोटाची खळगी भरण्याचं काम करतोय. कुणी जेवण म्हणून तर कुणी नाश्ता म्हणून वडापाव खातो. मुंबईसारख्या धावत्या शहरात वडापाव अनेकांची पोटाची भूक भागवतो. अवघ्या काही रुपयांमध्ये मिळणाऱ्या वडापावाने आतापर्यंत प्रत्येकाला आपलंस केलंय. वडापाव काळासोबत बदलत गेला. आता चीज वडापाव, मेवोनिस वडापाव अगदी चिकन वडापावही मिळतो. मात्र खरी भूक भागते ती झणझणीत चटणी, तळलेली मिर्ची आणि गरमागरम बटाटावडा पावानेच. 'गरिबांचा बर्गर' हा शब्दच वडापाव आणि गोरगरिबांशी असलेलं नात ठळकपणे नमूद करतो. मात्र आता या वडापावला ही मंहागाईची दृष्ट लागलीय. (vada pav is likely to become more expensive now due to increased pav rate) 

लवकरच सर्वसामान्यांचा वडापाव आणखी महाग होण्याची शक्यता आहे. पावाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे वडापाव महाग होण्याची शक्यता आहे. यंदा तिसऱ्यांदा पावाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वडापावचे दर वाढू शकतात. सर्वसामान्यांची वडापावला मोठी मागणी असते. तसंच वडापावचे अनेक ब्रँड राज्यात आहेत. मात्र आता वडापाव खाण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागू शकतात. त्यामुळे ग्राहक वर्गात नाराजीचं वातावरण आहे.