आठवड्याभरात भाज्यांच्या दरात मोठी वाढ

कोरोनाचा असाही फटका 

Updated: Jul 6, 2020, 10:04 AM IST
आठवड्याभरात भाज्यांच्या दरात मोठी वाढ  title=

मुंबई : एका बाजूला कोरोना तर दुसऱ्या बाजूला पावसाचा तडाखा यामुळे सामान्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. याच गैरसोयीचा फायदा घेत भाजी विक्रेत्यांनी भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. यामुळे सामान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. 

टोमॅटोचा दर किलो मागे ७० रुपये असून हा दर १०० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्रतवण्यात आली आहे. तर कांद्याचा दर ४० रुपये किलो झाला आहे. यंदा भाज्यांपेक्षा बटाट्याचा दर वाढला आहे. बटाटा ५० रुपये किलो इतका आहे. 

तसेच लसूणचा दर २०० रुपये किलो आहे तर काकडीचा दर ५० रुपये आहे. वांगीने ६० रुपयांचा आकडा गाठला आहे. भेंडी ५५ रुपये किलो आहे. भाजीच्या दर होलसेल भावापेक्षा मोठी वाढ झाली आहे. 

एपीएमसी मार्केट कमिटीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक भाज्यांचा साठा मोठा प्रमाणात करून ठेवत आहे. जेणेकरून घराबाहेर लवकर पडण्याची वेळ येणार नाही. शुक्रवारी भाजी आणि फळांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

सोमवारपासून पुन्हा लॉकडाऊन होणार ही अफवा पसरवली जात होती. त्यामुळे शुक्रवारपासून भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याचप्रमाणे गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आहे. याचा पावसाचा देखील परिणाम भाज्यांच्या दरांवर झाला आहे, अशी माहिती माटुंगा मार्केटमधील भाजी विक्रेत्याने दिली आहे. 

एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात भाज्या उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही चिंता करू नये अशी माहिती देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे भाज्यांचे दर हे किरकोळ बाजारात सर्वाधिक वाढले आहेत. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकं घरापासून लांब जाण टाळत आहेत. यामुळे जवळच्या किरकोळ बाजारात भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत.