अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात यश

मुंबईतल्या विक्रोळीच्या टागोर नगर ग्रुप नंबर सहामध्ये खोदलेल्या खड्ड्यात अडकलेल्या दोन्ही कामगारांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

Jaywant Patil Updated: Mar 16, 2018, 06:48 PM IST
अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात यश

मुंबई : मुंबईतल्या विक्रोळीच्या टागोर नगर ग्रुप नंबर सहामध्ये खोदलेल्या खड्ड्यात अडकलेल्या दोन्ही कामगारांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. तीन साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनतर या कामगारांना बाहेर काढलं आहे. 

ड्रेनेज लाईनचं काम सुरू असताना अडकले

खोदलेल्या खड्ड्यात पालिकेच्या ड्रेनेज लाईनचं काम सुरू असताना, हे दोन कामगार अडकले होते. तब्बल १५ फूट खोल खड्डा आणि दलदल असल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून दोन्ही कामगारांना बाहेर काढलं. 

कामगारांसोबत नागरिकांचा जीव धोक्यात

मात्र हे कामगार जखमी झाले आहेत. काम सुरू असताना, पालिका प्रशासन सुरक्षेसाठी उपाययोजना करत नसल्यानं, कामगारांसोबत नागरिकांचा जीव धोक्यात घालत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x