राज्यावर पाणीटंचाई आणि भारनियमनाचे संकट

राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे मोठे संकट उभे राहणार आहे. पाणीटंचाईबरोबर भारनियमनावर मोठा परिणाम होणार आहे.

Updated: Jun 21, 2017, 04:07 PM IST
 title=

मुंबई : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे मोठे संकट उभे राहणार आहे. पाणीटंचाईबरोबर भारनियमनावर मोठा परिणाम होणार आहे.

कोयना धरणात पक्त ११.६७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठी शिल्लक आहे. सद्यस्थितीत पूर्वेकडील सिंचनासाठी सोडण्यात आलेलं पाणी बंद करण्यात आलेलंय. तर पश्चिमेकडचा कोयना जलविद्युतचा चौथा टप्पा गरजेनुसार बंद करण्यात येईल. त्यामुळे भारनियमनाचं संकट राज्यावर आहे.

 गेल्या १५ दिवसांत पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यानं कोयनेतला पाणीसाठी संपत आलाय. दोन महिन्यांपूर्वी कर्नाटकलाही दोन टीएमसी पाणी देण्यात आलं. त्यावरूनही वादंग माजलं होतं. चार टीएमसी मृत साठा आहे. त्यामुळं राज्यभर चिंतेचं वातावरण आहे.