महाराष्ट्र... एक पाऊल पुढे | २०२०-३० याचं व्हिजन काय असेल? सांगतायत उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोनानंतरचा महाराष्ट्र कसा असेल? 

Updated: Jun 27, 2020, 08:11 PM IST
महाराष्ट्र... एक पाऊल पुढे | २०२०-३० याचं व्हिजन काय असेल? सांगतायत उपमुख्यमंत्री अजित पवार title=

मुंबई : कोरोनाने संपूर्ण जगाला वेढीस धरलं आहे, असं असताना कोरोनानंतरचं राज्याचं व्हिजन काय असेल? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झी चोवीस तासच्या ' ई-संवाद - महाराष्ट्र एक पाऊल पुढे'  या खास कार्यक्रमात आपलं मत व्यक्त केलं.

कोरोनाच्या काळात आपल्या सगळ्यांना एक गोष्ट लक्षात आली की, घरून काम करण्याकडे अशी एक पद्धत पुढे आली आहे. काही गोष्टींवर याचा परिणाम झाला आहे जसं की, सिनेमागृहात जाऊन सिनेमे पाहणं. हे लोकं टाळणार आहेत. एवढंच नाही तर मॉलमध्ये फिरणं आणि शॉपिंग करणं लोकं टाळत आहेत. आता लोकं ऑनलाईन ऑर्डर करतात आणि गोष्टी घरपोज मिळतात. सगळ्या गोष्टी सुटसुटीत होणार आहेत. (महाराष्ट्र एक पाऊल पुढे | भविष्यात आरोग्य आणि शिक्षणाला प्राधान्य देणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे) 

या सगळ्याचा विचार करता.  २०२०-३० याचं व्हिजन काय असेल याबाबत आम्ही तयारी करत आहोत. कुठल्या इंडस्ट्रीला आपण वेलकम केलं पाहिजे? तसंच कोणत्या इंडस्ट्रीला आपण रेट कार्पेट टाकलं पाहिजे. यावर आम्ही चर्चा करत आहोत. 

आता चीनला संपूर्ण देशाने घेरलं आहे. चीनमधून बाहेर पडलेल्या लोकांना महाराष्ट्रात कसं आकर्षित करता येईल? याचा विचार केला गेला आहे. बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. 

वर्षानुवर्षे ज्या गोष्टी केल्या जात आहेत. त्याला देखील फाटा देणं आवश्यक आहे. ते सुद्धा येत्या काळात केलं जाणार आहे. ईलर्निंगच्या गोष्टी देखील समोर आणणार आहोत. व्हिजन २०२०-३० आगामी काळात लवकरच समोर आणणार.